ऐंशी वर्षीय आई सुखरूप घरी परतली | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : येथील शशिकला नरहरशेट्टीवार या ऐंशी वर्षीय आईची तब्बेत बिघडली. तपासणीअंती ती कोरोनाबाधित निघाली. यामुळ कुटुंबीय प्रचंड घाबरले. इतर सदस्यांनी तपासणी केली. मात्र, त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. आपल्या आईच कस होणार या चिंतेत कुटुंबीय असताना प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर ऐंशी वर्षीय आईन कोरोनावर मात केली. त्या सुखरूप होऊन घरी परतल्यानंतर कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. घरासमोर फटाके फोडून, आईची आरती ओवाळून, शेजारच्यांना मिठाईचे वितरण करीत नरहरशेट्टीवार कुटुंबीयांनी आनंदोत्सव साजरा केला. (व्हिडिओ - संदीप रायपुरे)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended