पिंपरी चिंचवडसह मावळचा वर्षभराचा पाणी प्रश्न मिटला! पवना धरणातून 98 टक्के भरले | Sakal Media |
  • 3 years ago
पिंपरी चिंचवडसह मावळचा वर्षभराचा पाणी प्रश्न मिटला! पवना धरणातून 98 टक्के भरले

पवनानगर : मावळ तालुक्यातील पवना धरणातून आज सकाळी १० वाजल्यापासून २२०० क्युसेकने धरणाच्या सांडव्यातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा पवना पाटबंधारे विभागाने दिला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर सुरूवातीचे दोन महिने(जुन व जुलै) पावसाने ओढ दिल्याने मावळातील धरणे भरतील का नाही? अशी शंका निर्माण झाली होती परंतु, ऑगस्ट महिन्यात झालेल्या दमदार पावसाने पवना धरण ९८ टक्के भरले आहे.
(व्हिडिओ : भारत काळे)


Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended