धूलिवंदनानिमित्त बच्चू कडूंनी रंगवली गावातील शाळा | Bachchu Kadu on Holi| Amravati

  • last year
होळी सणाच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला सर्व लोक एकमेकांना रंग लावून धुलीवंदन साजरा करत असतात. परंतु आमदार बच्चू कडू यांनी याच धुलिवंदनाला एक स्तुत्य उपक्रम केला आहे. बच्चू कडू यांनी त्यांच्या आईंच्या स्मृतिप्रीत्यर्थ मागील वर्षीपासून शाळेच्या रंगोटीचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचं यावर्षीचे हे दुसरे वर्ष असून त्यानिमित्ताने आमदार बच्चू कडू यांनी आज कुरळपूर्णा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन स्वतः हाताने रंगरंगोटी केली. दरम्यान बच्चू कडूंच्या या उपक्रमाच सर्वत्र कौतुक होत आहे. पुढल्या वर्षी प्रत्येक जिल्ह्यातील एक शाळा प्रहारचे कार्यकर्ते रंगवतील असंदेखील बच्चू कडू म्हणाले.

Recommended