सोलापूर कृषी प्रदर्शनातला एक कोटीचा गजेंद्र रेडा पाहण्यासाठी लोकांची झुंबड
  • last year
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील मंगसुळीच्या विलास गणपती नाईक या हौशी पशुपालकानं गजेंद्र हा रेडा पाळला आहे. पशू पालन हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे १५ म्हशींचे पालन केले जाते. पाच वर्षांपूर्वी विलास नाईक यांनी चक्क हरियाणात जाऊन एक मुरा जातीची म्हैस १ लाख ४० हजार रुपयांना खास पालनासाठी गावी आणली. तिच्यापासून या गजेंद्र रेड्याचा जन्म झाला. त्याला अगदी घरच्याप्रमाणे सारे नाईक कुटुंब सांभाळतात. त्याचा दिवसाचा खर्च दोन हजार रुपये आहे.
Recommended