आंदोलनाची छापली चक्का निमंत्रण पत्रिका, बीडमधील उस उत्पादक शेतकऱ्यांची चर्चा

  • last year
आंदोलन करण्यासाठी छापलेली एक निमंत्रण पत्रिका सध्या बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला बनली आहे. माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथे शेतकरी संघर्ष समितीचे नेते गंगाभीषण थावरे आणि परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस मागील २५ महिन्यांपासून शेतातच उभा आहे. काही दिवसांपूर्वी जय महेश साखर कारखान्याविरोधात शेतकरी संघर्ष समिती आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. मात्र द्वेषापोटी या शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी नेण्यात आला नाही. दरम्यान याकडे लक्ष वेधण्यासाठी थेट निमंत्रण पत्रिका छापण्यात आली आहे. यामध्ये उसाची होळी करून ऊस पेटवून दिला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ही होळी पेटवली जाणार आहे, असे या निमंत्रण पत्रिकेत नमूद आहे.

Recommended