सावधान! Corona वाढतोय.. पुन्हा Lockdown लागणार? डॉ. संग्राम पाटील म्हणतात.. | Covid-19 | Coronavirus
  • last year
"जातोय-जातोय म्हणताच कोरोना पुन्हा आलाय. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. चीनमधून येणाऱ्या बातमीनुसार, तिथल्या सरकारने Zero कोविद पोलिसी काढल्यानंतर हॉस्पिटल्स मध्ये पेशंट्सची संख्या वाढू लागली आहे. एका एक्सपर्टस च्या मते पुढच्या ९० दिवसात चीनमधली ६०% जनता आणि जगभरातील १०% जनता कोरोनाने बाधित होण्याचा धोका आहे. शिवाय, कोरोनाने चीनमध्ये २० लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
पण फक्त चीनमध्येच नाही तर जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिकेमध्ये सुद्धा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. WHO ने सुद्धा यावर चिंता व्यक्त केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता भारत सरकारही अलर्ट मोडवर आलय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कोविद review मिटिंग घेतली. आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी सुद्धा हाय लेवल मिटिंग आयोजित केली होती. याशिवाय, राज्य सरकारनं जेनोम sequencing करण्याचाही सल्ला दिलाय.
पण चीनमध्ये आणि बाकी काही देशांमध्ये पसरणाऱ्या कोविदचा भारताला नक्की किती धोका आहे, आपण काय काळजी घ्यायला हवी, या सर्वमुद्द्यांवर आमच्या Associate Editor, Arti Ghargi यांनी डॉ संग्राम पाटील यांच्याशी चर्चा केलीय.

#CovidIsNotOver #Coronavirus #Covid19 #DrSangramPatil #China #chinacovid #CovidIsBack #HWNews
Recommended