उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला मराठी चित्रपट 'गोदावरी' चा ट्रेलर लॉन्च

  • 2 years ago
निखिल महाजन दिग्दर्शित 'गोदावरी' चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे, ब्लू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित या चित्रपटात जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नात्यांची मूल्य सांगणारा, रुढी, परंपरा आणि भावनांचे उत्तम मिश्रण असलेला, असा हा कौटुंबिक चित्रपट येत्या 11 नोव्हेंबरला रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Recommended