Shirdi Temple Meeting : साई संस्थान, विक्रेते आणि ग्रामस्थांची आज बैठक, बंदी उठणार?

  • 2 years ago
शिर्डी साई मंदिरात हार, फुलं आणि प्रसादावरील बंदी उठणार का याकडं साई भक्तांचं लक्ष लागलंय.. याच पार्श्वभूमीवर आज साई संस्थान, स्थानिक विक्रेते आणि ग्रामस्थांची बैठक होणार आहे... या बैठकीला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित राहणार आहेत.. काल झालेल्या बैठकीत फुलं, प्रसादावरील बंदी उठवण्याबाबत कुठलाही निर्णय झाला नाही.. बंदीचा हा निर्णय त्रिसदस्यीय समितीचा होता. तसंच शिर्डीतील विविध पक्षांच्या नेत्यांनी बंदी कायम ठेवण्याची मागणी केली होती असं या बैठकीनंतर सांगण्यात आलं...या संदर्भात राज्य सरकारची काय नियमावली येते त्यानुसार पुढील निर्णय घेऊ असं संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी सांगितलंय... दरम्यान मंदिरात फुलं, हार आणि प्रसाद नेण्यावरुन जोरदार गोंधळ झाला...

Recommended