चालकानं थकीत पगार मागितला, भरगर्दीत भाजप नेत्याची फजिती झाली | Sakal Media

  • 2 years ago
तीन महिन्यांचा थकलेला पगार मागणाऱ्या चालकास भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने (BJP Leader) ढकलून देत धमकावले. ही घटना माढा तालुक्यातील मोडनिंब येथे घडली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singha Naik Nimbalkar) यांच्यासमोरच घडला. त्यामुळे भाजप जिल्हाध्यक्षदाच्या शर्यतीत असलेल्या या नेत्यावर नामुष्कीची वेळ आली. (BJP leader threatened a driver who demanded unpaid salary)

Recommended