Kedar Shinde : केदार शिंदे यांचा नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला... | Sakal Media |
  • 2 years ago
प्रेक्षकांच्या मनातील भावना, आवडीनिवडी अचूक ओळखून, तुमच्याआमच्या घरातील गोष्ट अगदी सहजरित्या प्रेक्षकांसमोर मांडणारे दिग्दर्शक केदार शिंदे पुन्हा एकदा एक नवीन चित्रपट सादर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘बाईपण भारी देवा’
आई, आजी, बहिण, पत्नी, मुलगी, काकू, आत्या, मावशी... अशी अनेक जिव्हाळ्याची नाती. मी सुज्ञ झालो तो यांच्याच संस्काराने..."अगं बाई अरेच्चा" सिनेमा करताना स्त्रीयांच्या मनातल्या गोष्टी ऐकण्याचा प्रयत्न केला."बाईपण भारी देवा" सिनेमात त्यांच्या अंतर्मनात डोकावण्याचा प्रयत्न केला आहे...आज "लवकरच भेटू" असं जाहिर करताना.. घराघरात पोहोचविण्याची जबाबदारी त्यांची आहे आणि मनामनात पोहोचवण्याची माझी आणि माझ्या टीमची...ज्यांना मनापासून तुम्ही मानता... त्या स्त्रीला आज नक्कीच सांगा... त्यांचा सिनेमा येतोय..."बाईपण भारी देवा" घेऊन येतोय तुमच्या आमच्या घरातल्या सुपरवूमनची गोष्ट!
लवकरच!

Recommended