Mahashivratri Special l औरंगाबादेतील वेरुळमध्ये १२ ज्योतिर्लिंगांचं ६० फुटी मंदिर l Sakal

  • 2 years ago
वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणी आणि बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेव मंदिरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या विश्वकर्मा मंदिराच्या परिसरात शिवलिंग आकाराचे देशातील सर्वात मोठे मंदीर उभारण्यात आलंय. या मंदिरात बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना करण्यात आलीये. हे मंदिर महाशिवरात्रीपासून भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे. महाशिवरात्री रोजी सकाळी शिवलिंग प्राण प्रतिष्ठापना यज्ञ तर दुपारी शिववक्ता जयंतीभाई शास्त्री यांच्या वाणीतून शिवकथा होणार आहे. महाशिवरात्रीच्या पर्वावर शिवलिंगाची प्रतिष्ठापना, शिवकथेचा समारोप होणार आहे. या मंदिराची एकूण उंची साठ फूट , पिंड चाळीस फूट , शाळूका अडोतीस फूट , मंदिराचा आकार एकशे आठ फुट बाय एकशे आठ फूट आहे.


#MahashivratriSpecial #Mahashivratri #MahashivratraVideos #MahashivratraPooja #ShankarBhagwan #ShivTemplesinIndia #ShivTempleinMaharashtra #12Jotirling #esakal #SakalMediaGroup

Recommended