Mahashivratri 2022 | महाशिवरात्रीनिमित्त प्रणिती शिंदे घृष्णेश्वर मंदिरात दर्शनाला | Sakal |

  • 2 years ago
Mahashivratri 2022 | महाशिवरात्रीनिमित्त प्रणिती शिंदे घृष्णेश्वर मंदिरात दर्शनाला | Sakal |


महाशिवरात्रीनिमित्त औरंगाबादेतल्या वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णश्वेर मंदिराचे दार उघडल्यापासून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. मध्यरात्रीपासूनच मंदिराच्या गाभाऱ्यात पिंडीचे दर्शन घेण्यासाठी आणि अभिषेकासाठी भाविकांची गर्दी झाली. घृष्णेश्वर मंदिरातील पिंडीची जलधारा पूर्व दिशेला असल्यामुळे भाविक घृष्णेश्वर मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घालतात. देशभरातून हजारो भाविक औरंगाबाद, वेरूळमध्ये दाखल झाले आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनीही घृष्णेश्वराचे दर्शन घेतले.


#MahashivRatri202 #Aurangabad #Verul #Congress #pranitishinde #marathinews #maharashtranews

Recommended