VIDEO | चाहत्यांनं अवघ्या २० मिनिटांत निलेश लंकेंना शिवून दिला शर्ट

  • 2 years ago
कोविड काळात पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी अनेकांना मदतीचा हात दिला. त्यांच्या याच कामामुळे राज्यभरात अनेकजण त्यांचे चाहते बनले आहेत. आमदार निलेश लंके हे राहाता येथे आले असता त्यांनी विविध दुकानांना भेटी दिल्या. याच वेळी त्यांनी अमोल चौधरी यांच्या समर्थ टेलर या दुकानाला देखील भेट दिली. त्यानंतर लंके हे तरटे नावाच्या मित्राकडे जेवणासाठी गेले. मात्र त्याचवेळी अमोल चौधरी आणि मित्र सिराज शेख यांना एक कल्पना सुचली. लंके यांना भेट देण्यासाठी चौधरी यांनी अवघ्या वीस मिनिटात नवीन शर्ट शिवून तयार केला.

Recommended