Headline: जोर लगा के हईशा! मुंबईच्या महापौर रस्सीखेच खेळताना

  • 2 years ago
बईतील श्रमिक जिमखाना येथील महापालिकेच्या शाळेत एका मंचातर्फे रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यादेखील उपस्थित होत्या. या स्पर्धेत एकूण 60 संघांनी सहभाग घेतला होता. सर्वच खेळाडू उत्साहात दिसत होते. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनाही खेळाचा मोह न आवरल्याने त्यांनीही यात सहभाग घेतला. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर संपूर्ण शक्ती पणाला लावत रस्सी खेचताना दिसल्या. दोन्ही संघाचा उत्साह हा पाहण्या सारखा आहे. यावेळी पेडणेकरांनी डोक्यावर पिवळा रंगाचा फेटाही बांधला होता. मुंबईच्या महापौर रस्सीखेच खेळतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Recommended