रिया is back! रेडिओ मिर्चीच्या ऑफिसबाहेरील व्हिडिओने चाहत्यांचे वेधले लक्ष

  • 2 years ago
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं निधन होऊन आता बराच काळ लोटला आहे. सुशांतचं निधन झाल्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती चांगलीच चर्चेत आली होती. यावेळी रिया चक्रवर्ती ऑल इन ब्लॅक आऊटफिटमध्ये रेडिओ मिर्चीच्या ऑफिसबाहेर दिसली. दोन वर्षानंतर पहिलेच शूट असल्याचं यावेळी रियाने तिच्या चाहत्यांना सांगितलं. दरम्यान, २०२० या वर्षात रियाला अनेक संकटांना समोरं जावं लागलं. रिया चक्रवर्तीने २००९ मध्ये एमटीव्हीच्या 'स्कूटी टीन डीवा' या शोपासून तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने 'मेरे डॅड की मारुती', जलेबी, 'सोनाली केबल', 'हाफ गर्लफ्रेंड', 'चेहरे' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.

Recommended