हृतिक रेस्टॉरन्टबाहेर झाला स्पॉट; मिस्ट्री गर्लचा हातात हात घेतल्याने चर्चेला उधाण

  • 2 years ago
हृतिक रोशन बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय स्टार्सपैकी एक आहे. तो नुकताच मुंबईतील एका जपानी रेस्टॉरन्टमध्ये डिनरला गेलेला दिसला. यावेळी तो एका मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट झाला. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की, ही मिस्ट्री गर्ल कोण आहे? हृतिक रोशनने रेस्टॉरन्टमधून बाहेर येताना या मिस्ट्री गर्लचा हात धरला आणि तिला आपल्या लक्झरी गाडी बसवलं. त्यानंतर दोघेही निघून गेले. हृतिकचे या मिस्ट्री गर्लसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हृतिक रोशनच्या फॅन्सच्या मनात मिस्ट्री गर्लबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. हृतिक रोशनच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर तो लवकरच अॅक्शन सिनेमा 'विक्रम वेधा' मध्ये दिसणार आहे.

Recommended