Home Isolation: गृह विलगीकरणामध्‍ये काय करावे आणि काय करू नये
  • 2 years ago
पुण्यासह राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. तिसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग जरी झपाट्याने होत असला तरी घाबरण्याचे कारण नाही असे वैद्यकीय तज्ञांचं मत आहे.
ओमायक्रोन च्या रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी रुग्णांनी घरातच स्वतःला विलग म्हणजेच आयसोलेट करुन उपचार घेऊ शकता असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला रुग्ण खबरदारी म्हणून स्वत:ला घरातच विलग करू शकतो.
त्याला होम आयसोलेशन म्हणजेच गृहविलगीकरण म्हणतात. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टर सध्या देतायत.
#homeisolation #homeisolationews #homequarantine #covid19 #thirdwave #homequarantinetips
Recommended