"विजेचा वापर करत असाल तर बिल भरावं लागेल"; शेतकऱ्यांना केल्या जाणाऱ्या सक्तीवरून ऊर्जामंत्र्यांचं वक्तव्य
  • 2 years ago
शेतकऱ्यांना थकबाकी वीज बिल भरण्यासाठी महावितरणाकडून सक्ती केली जात आहे. वीज बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित केला जाईल, असं महावितरणकडून सांगण्यात आलं आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत दिली असली तरी वीज बिलात सवलत देण्याची त्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी करण्यात येणाऱ्या सक्तीवरून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. "कोणालाही वीज फुकट मिळणार नाही. महावितरलाही विजेसाठी पैसे मोजावे लागतात. त्यामुळे विजेचा वापर करत असाल तर बिल भरावं लागेल.", असं ते म्हणाले आहेत.

#electricity #MahaVitaran #NitinRaut #maharashtra
Recommended