स्पेशल रिपोर्ट | चला हिंगोलीय का, हिंगोली... एसटीची किंमत समजावून सांगणारी वडापची सफर

  • 2 years ago
गेल्या एक महिन्यापासून एसटी बस सेवा बंद असल्याने प्रवासी, नोकरदार, विद्यार्थी, दुधवाले आदी लोकांना मोठ्या गैरसोईंचा सामना करावा लागतो आहे. खाजगी वाहनातून प्रवास हा सुखकर होत नसून भाडेवाढीचा मनस्ताप देखील सहन करावा लागत असल्याचं प्रवाशी सांगत आहेत. त्याचबरोबर खाजगी बस स्थानकावर प्रवासी निवारे नसल्यामुळे ऊन, वारा,पाऊस असल्यास मोठी प्रवाशांची तारांबळ उडत आहे. नेमका खाजगी प्रवास कसा सुरु आहे हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. याचा हिंगोलीमधून खास आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विकास दळवी यांनी.

Recommended