१९७१ च्या भारत-पाक युद्धात कराची बंदरावर हल्ला करणारी नौदलाची 'किलर्स स्क्वॉड्रन'

  • 2 years ago
स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाला विविध युद्धांना सामोरं जावं लागलं. यापैकी १९७१चं पाकिस्तान विरोधातलं युद्ध महत्त्वाचे समजलं जातं कारण यामुळे जगाच्या पटलावर एका नव्या देशाची बांगलादेशची निर्मिती झाली. या युद्धात पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्यात नौदलाच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौका 'किलर्स स्क्वॉड्रन' ने महत्त्वाची भूमिका बजावली होती, कराची बंदरावर यशस्वी हल्ला केला होता. हा युद्धनौकांचा ताफा हा आता '२२ किलर किलर्स स्क्वॉड्रन' या नावाने ओळखला जातो. कराची बंदरावर केलेल्या हल्ल्याला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने नौदलाच्या या स्क्वॉड्रनला येत्या ८ डिसेंबर रोजी ‘राष्ट्रपतींचे मानांकन’ देऊन सेनादलांचे सर्वोच्च सेनापती असलेल्या राष्ट्रपतींच्या हस्ते समारंभपूर्वक गौरविण्यात येणार आहे.

#NavyDay #IndianNavy #04Dec #1971War #Killers

Naval Killers Squadron attacking Karachi port during 1971 Indo-Pak war

Recommended