दिवाळीची सुट्टी नक्की कधी?; शिक्षण विभागातील समन्वयाअभावी पालक, शिक्षक संभ्रमात

  • 3 years ago
दिवाळीची सुट्टी हा शाळेतील विद्यार्थ्यांच्या अगदी जवळचा विषय. मुख्यतः दिवाळीची सुट्टी लागण्याआधी सहामाही परीक्षा होतात. त्यामुळे विद्यार्थी दिवाळीच्या सुट्टीचा अगदी मनसोक्त आनंद घेतात. परंतु यंदा शिक्षण विभागातील समन्वयाअभावी शाळांच्या दिवाळीच्या सुट्टीवरून गोंधळ निर्माण झालाय. शिक्षण विभागाने अचानक गुरूवारपासून शाळांना सुट्टी देण्याचे आदेश दिल्याने परीक्षा, निकाल, वेळापत्रक यांबाबत शाळा, पालक संभ्रमात आहेत. सुरुवातीला १ ते २० नोव्हेंबर या कालावधीत देण्यात आलेली सुट्टी अचानक २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर अशी करण्यात आली आहे. त्यामुळे पालक, शिक्षक, विद्यार्थी संभ्रमात आहेत.

#diwali #holidays #students #teachers #exams #parents #festival

Recommended