Amravati ; राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना वाहिली मौन श्रद्धांजली ; पाहा व्हिडीओ
  • 2 years ago
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना वाहिली मौन श्रद्धांजली
अमरावती : अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा आज ५३ वा पुण्यतिथी महोत्सव. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे महानिर्वाण ११ ऑक्टोबर १९६८ रोजी ४ वाजून ५८ मिनिटांनी गुरुकुंज मोझरीत झाले होते. त्यामुळे ५३ वर्षांपासून त्यांना पंचांगानुसार श्रद्धांजली अर्पण केली जाते. आज देशभरातील हजारो गुरुदेव भक्तानी अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी मध्ये त्यांच्या महासमाधी स्थळी उपस्थित राहून तर लाखो गुरुदेव भक्तांनी घरून ४ वाजून ५८ मिनिटांनी तुकडोजी महाराजांना दोन मिनिट स्तब्ध होऊन मौन श्रद्धांजली अर्पण केली. तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली वाहिण्यासाठी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील उपस्थित लावली. (व्हिडिओ - प्रशिक मकेश्वर)

#amravati #tukdoji maharaj #esakal #sakalmedia
Recommended