पुणे : आठवीतील मुलीवर कोयत्याने वार करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

  • 3 years ago
मागील काही दिवसांमध्ये विविध गुन्हेगारी घटना घडल्यानंतर आता पुन्हा एकदा पुणे एका घटनेमुळे हादरले आहे. शहरातील बिबवेवाडी परिसरातील इयत्ता आठवीमध्ये शिकणारी आणि कबडीपट्टू असलेल्या मुलीची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. हृषिकेश भागवत असे आरोपीचे नाव आहे.

Recommended