चीन ने केली पुन्हा वैरत्वाची भाषा । सिमेवर तणावाची परिस्तिथी पहा हा व्हिडिओ | Lokmat News

  • 3 years ago
डोकलाम वादावरून गेल्यावर्षी भारत आणि चीन यांच्यात तब्बल ७३ दिवस मोठा तणाव निर्माण झाला होता. वर्ष २०१७ मध्ये चीनने नियंत्रण रेषेवर ४१५ वेळा घुसखोरी केली तर २०१६ मध्ये हा आकडा २७१ इतका होता. यात २०१७ मध्ये दोन्ही देशातील सैन्य २१६ वेळा आमने-सामने उभे ठाकले होते. तर २०१६ मध्ये १४६ वेळा समोरासमोर आले होते. भारतीय सैन्यदलाच्या हवाल्याने मिळालेल्या वृत्तानुसार नियंत्रण रेषेवर २३ वेळा दोन्ही देशांमध्ये गंभीर वादाचे प्रसंग घडले. यामध्ये लडाख, केडेमचौक, चुमार, पेंगोंग, स्पांगूर गॅप, हिमाचल प्रदेशमधील कौरिक, उत्तराखंडमधील बाराहोती, अरुणाचल प्रदेशातील नमका चू, सुमदोरोंग चू, असफिला आणि दिबांग घाट सारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended