चोरांनी ८०० किलो शेण का चोरलं | Chhattisgarh 800 kg Cow Dung Stolen | India News

  • 3 years ago
चोरी करताना चोर काय चोरतात.. पैसे, सोनं, गाडी, मौल्यवान वस्तू, महागड्या वस्तू, फार तर फार कपडे, आणि घरगुती वापराचं सामान.. यापेक्षा वेगळी काय चोरणार. चोरी करण्यासाठी जोखीम घ्यायची तर मोठा हात मारायचा.. असा चोरांचा समज असतो. त्यामुळेच मोठी किंमत मिळेल अशीच चोरी केली जाते.. पण.. पण.. आता चोरांच्याही आवडीनिवडी बदलल्या आहेत असंच म्हणावं लागेल. कारण तशी घटना समोर आलीय..
छत्तीसगड राज्यातील कोरबा जिल्ह्यात एक वेगळाच प्रकार समोर आलाय. तो ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. एका गावातील ८०० किलो शेण चोरीला गेल्याची घटना समोर आलीय आणि या प्रकरणी गावकऱ्यांनी पोलिसात तक्रारही दिलीय. पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात चोरांनी ढुरेना गावातील गोठ्यामध्ये असलेले ८०० किलो शेण चोरलं आहे. ज्याची किंमत १६०० रुपये आहे. आणि विशेष म्हणजे पोलीसही या प्रकरणाचा तपास करत आहेत. ज्या शेणाला कोणी विचारत नाही.. ते शेण का चोरलं गेलं. असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. तर हे शेण का चोरलं, त्यामागे काही कारणं आहेत..

#lokmat #ChhattisgarhNews #CowDungStolen #ChhattisgarhPolice
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended