गेम झाला...भाजपचे 33 आमदार फुटणार? West Bengal 35 BJP MLA Resign | India News

  • 3 years ago
महाराष्ट्रात भाजपकडून नेहमीच सत्ताबदलाची भाषा केली जाते. महाविकास आघाडीतील आमदार फोडाफोडीची सुद्धा चर्चा होते. उदाहरण द्यायचं झालं तर अशाचप्रकारे आयात आमदारांच्या मदतीने इतर काही राज्यातही भाजपने सत्ता मिळवली आहे. निवडणुकीच्या तोंडावर नेते फोडले. नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीतही तेच झालं. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे मोठे नेते भाजपने फोडले. अनेक आमदारांना पक्षात घेतलं आणि भाजपकडून तिकीट दिलं. त्यातील अनेकजण आमदारही झाले. आयात केलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा पराभवसुद्धा केला. त्यांना विरोधी पक्षनेत्याचं बक्षीस मिळालं. एकप्रकारे बंगालमध्ये भाजप सत्तेत आला नसला तरी त्यांचा जनाधार वाढला. विधीमंडळात सदस्य संख्या वाढली. पण आपल्याकडे 'नव्या नवरीचे नऊ दिवस' अशी एक म्हण आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता पुन्हा सत्तेत आल्या आणि खेळ झाला. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे तब्बल ३३ आमदार हे पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.

#lokmat #WestBengal #BJPMLA #Amitshah #Narendramodi
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended