घाणेरडी भाषणं ही तुमच्या नाकर्तेपणाचं प्रदर्शन | Kangana Ranaut on Uddhav Thackeray | Maharashtra

  • 3 years ago
अभिनेत्री कंगणा राणावतने जोरदार उत्तर दिलंय, तुम्ही जनतेचे सेवक आहात, महाराष्ट्राचे ठेकेदार नाही, असं कंगनानं ट्वीट करत म्हटलं आहे. मुख्यमंत्री हे देश विभागण्याची भाषा करत असल्याची टीका कंगणाने केली. कंगनाने ट्वीट करत म्हटलं की, 'जशी हिमालयाचं सौंदर्य संपूर्ण भारतीयाचं आहे, त्याचप्रमाणे मुंबई ज्या संधी देते त्या आम्हा सर्वांशी संबंधित आहे. ही दोन्ही माझी घरं आहेत. उद्धव ठाकरे तुम्ही आमच्याकडून आमचे लोकशाही अधिकार काढून घेण्याचा आणि आम्हाला विभागण्याचा प्रयत्न करू नका. तुमची घाणेरडी भाषणं तुमच्या नाकर्तेपणाचं अश्लील प्रदर्शन करतात.'
कंगनाने आणखी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये ती म्हणाली की, 'तुम्हाला स्वतःची लाज वाटली पाहिजे. जनतेचे सेवक असूनही तुम्ही याप्रकारच्या क्षुल्लक भांडणांमध्ये सामील होत आहात. तुम्हाला ती खुर्ची शोभा देत नाही, ज्यावर तुम्ही बसून घाणेरडं राजकारण करत आहात.कंगणा आणि शिवसेना यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. या वादाला आता नवीन तोंड फुटण्याची शक्यता आहे.

#lokmat #KanganaRanaut #UddhavThackeray #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended