घरगुती हिंसाचाराला बळी पडला आहात ? हा व्हीडीओ पाहा | IPS Vishwas Nangare Patil | Nashik Police News

  • 3 years ago
लॉकडाऊनमुळे ज्या लोकांना घरच्यांसोबत राहण्यासाठी वेळच नव्हता, असे लोकं आता घरातच बसले आहेत. त्यांच्याकडे कुटुंबाला देण्यासाठी पुरेसा वेळही आहे. एरव्ही पती - पत्नी दोघंही नोकरी करायचे. घराच्या जबाबदाऱ्या जमेल तशा पार पाडायचे. मुलांकडे पाहायचे. पण लॉकडाऊनमुळे पहिल्यांदाच या नोकरदार कुटुंबाला एकत्र राहण्याची संधी मिळाली आहे. गेल्या दीड महिन्यापासून ते एकमेकांसोबत वेळ व्यतीत करताहेत. पण या चांगल्या संधीलाही काही लोकं मुकतात. घरातच राहिल्यामुळे क्षुल्लक कारणांवरून वाद होताहेत. पुरूष मंडळी फर्माईश करून नवनवीन पदार्थ रिचवण्यासाठी आग्रह धरताहेत. अनेक कुटुंबात वाद होत असल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात घरगुती हिंसाचारही वाढला आहे. लोकमत डॉट कॉमनी या संदर्भात पुण्याहून एक स्टोरीदेखील केली होती. मानसोपचार तज्ज्ञ आणि पोलिस अधिकाऱ्यांनी या बातमीला दुजोरा दिला होता. घरगुती हिंसाचारात महिलांनाच लक्ष्य बनवलं जातं. नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या कामी पुढाकार घेतलाय. एका लक्षवेधी व्हीडीओच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती करण्याचा प्रयत्न केलाय. हा व्हीडीओ पाहून तुम्ही काही बोध घ्याल ही अपेक्षा .. डॉ शैलेश गायकवाड आणि एसएस फील्मस यांनी तयार केलेला हा व्हीडीओ पाहूया ...

#LokmatNews #nashikpolice #ips #vishwasnagrepatil
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended