Eknath Shinde | महाआघाडीचे नेते घेणार राज्यपालांची भेट | Mahaaghadi | Maharashtra News

  • 3 years ago
सत्तास्थापनेपेक्षा शेतकऱ्यांचे हित महत्वाचे असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी महाआघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेणार असल्याचे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे . शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री निधी देखील सुरु करण्याची मागणी यावेळी करण्यात येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे . त्यामुळे महाआघाडीचे नेते राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेविषयी काही हालचाली करतील अशी अपेक्षा करण्यात आली होती ती एवढ्या लवकर होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

     राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम असला तरी, राष्ट्र्रावाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देत आहेत. आज महाआघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेविषयी काही हालचाली करतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी राज्यपालांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे . ठाणे महापालिकेच्या महापौर पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करण्यात आला,यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

      अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सत्तास्थापने पेक्षा त्यांना आर्थिक मदत मिळणे आवश्यक असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सत्तास्थापने विषय सर्व आमदारांनी शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना अधिकार दिले आहेत त्यामुळे तेच यासंदर्भात निर्णय घेतील असे त्यांनी स्पष्ट केले असून महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलेल्या नरेश म्हस्के आणि पल्लवी कदम यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. 

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #Eknathshinde #thanemunicipalcorporation #mahaaghadi

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाण

Recommended