BJP MP Pragya Thakur यांना संरक्षण समितीत स्थान | Bhopal
  • 3 years ago
मध्य प्रदेशमधील भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीत स्थान देण्यात आले आहे. या समितेचे नेतृत्त्व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे करत असून प्रज्ञा सिंह यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. शरद पवार, सुप्रिया सुळेंसोबत संरक्षण खात्याच्या समितीत ठाकूर यांना स्थान देण्यात आले आहे. वादग्रस्त वक्तव्य करुन प्रज्ञा सिंह नेहमीच चर्चेत असतात. संरक्षण मंत्रालयाच्या या समितीत एकूण 21 सदस्य आहेत.
प्रज्ञा सिंह ठाकूर या नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करुन वाद निर्माण करत असतात. काही दिवसांपूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधीबाबत ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी महात्मा गांधी यांना राष्ट्रपुत्र म्हटलं होतं. 

प्रज्ञा सिंह या 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकारातील आरोपी असून त्या सध्या जामिनावर बाहेर आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रज्ञा सिंह यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली होती. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे देशभक्त होता. मी त्यांना राष्ट्रवादी मानते, असे त्या म्हणाल्या होत्या. 26/11 हल्ल्यात शहीद झालेले दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे माझ्या शापाने मरण पावले, असे देखील त्या म्हणाल्या होत्या. या दोन्ही विधानांमुळे ठाकूर यांनी पक्षाला अडचणीत आणले होते. 

पण आता प्रज्ञा सिंह यांना थेट sarankshan खात्यात स्थान दिल्याने मोदी सरकारच्या अडचणीत वाढच झाल्याचं चित्र आहे कारण आता विरोधी पक्ष यामुळे मोदी सरकारवर टीका करत आहेत.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #MPPragyaThakur #BHOPAL

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat november2019
Recommended