Dr Amol Kolhe | गडकिल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयावरुन डॉ.अमोल कोल्हेंनी केलं सरकारला लक्ष्य | Bjp

  • 3 years ago
मंडणगड : गडकिल्ले भाडेतत्त्वावर देण्याच्या आपण निषेध करत असल्याचे उद्गार राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी काढले.खासदार कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाली आहे. मंडणगड तालुक्यातील बाणकोट येथील हिंमतगड किल्ल्याला खासदार कोल्हे यांनी भेट दिली. त्यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, रायगडचे खासदार सुनील तटकरे, स्थानिक आमदार संजय कदम हेही उपस्थित होते. महाराष्ट्रातील ब संवर्गातील किल्ले लग्न किंवा कार्यक्रमांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा दुर्दैवी निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आपण आलो असल्याचे त्यांनी सांगितले. गडकिल्ले मुळातच सुंदर आहेत. या किल्ल्याला तर समुद्राची पार्श्वभूमी आहे. तेथे वॉटर स्पोर्टस् सुरू करता येऊ शकेल. येथे शिवाजी महाराजांच्या जाज्वल्ल्य इतिहासाला उजाळा देता येईल. मात्र तसे न करता हे भाडेतत्त्वावर देण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे, त्याचा निषेध करावा तितका थोडा आहे, असे ते म्हणाले.

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #amolkolhe #bjp #fort

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19

Recommended