संकटकाळात आम्ही माणसांत देव पाहिला | Rescue People Interview | Kolhapur

  • 3 years ago
कोल्हापूर - पंचगंगा नदीला आलेल्या पुरातील बचावकार्यात एक दृश्य अत्यंत बोलकं ठरलंय. सोशल मीडियावर तो व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. त्यामध्ये, सैन्य दलाने पुराच्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबीयाची सुखरुप सुटका केली होती. त्यावेळी, बोटीतून सुरक्षितस्थळी जात असताना बोटीतील महिलेला अश्रू अनावर झाल्याचं दिसलं. या महिलेनं देवाचा धावा केला. पण, यावेळी तिला देव भेटला होता तो पायात बुट घातलेला, अंगावर आर्मीचा ड्रेस परिधान केलेला अन् जीवाची बाजी लावणारा भारतीय सैनिक.
त्या महिलेनं क्षणाचाही विचार न करता, बोटीतील जवानाचे पाय धरले. मनाला चटका लावून जाणारे हे दृश्य पाहून नेटीझन्स हळहळले. सैन्याच्या जवानानेही तितक्याच नम्रपणे अलगद आपला पाय पाठीमागे घेतला. जणू, ताई हे माझ कर्तव्यचं आहे, असंच काहीसं त्यांनी सूचवलं. मात्र, त्या माऊलीच्या डोळ्यातील पाणी, चेहऱ्यावरील भाव सारं काही सांगून जात होतं.

कोल्हापूरच्या चिखली गावाजवळील या महिलेनं नेमंक आपल्याला काय वाटलं होतं हे शब्दात सांगितलं आहे. त्यावेळी नेमकं काय घडलं हे सांगताना पुन्हा एकदा आर्मीच्या जवानांमुळेच आम्ही जिवंत असल्याचं सुजाता यांनी म्हटलं आहे. पाण्यातून बाहेर येतुय की नाही यामुळं आम्हाला भिती वाटत होती. आदल्यादिवशीच कळाल होतं की पलुसमध्ये बोट उलटी झालेलीय. अन् आमच्या बोटीमधी आमच्या घरची सगळी माणसं होती, लहान मुलं सगळी होती. त्यामुळे भिती वाटत होती. पाणी बघून कुणाला काय झालं तर काय करायचं ? त्यात मध्येच साप आला होता. आर्मीवाल्यांनी झटकन त्याला फेकून दिला. बोटमधी शिरला असता तर काय ? ही भिती होती मनात. आम्हास्नी वाट जायना झालती. पाणी सगळ बघून आम्हाला खूप भिती वाटत होती. आम्हाला त्यांनी सुखरुप बाहेर काढलं, त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत. म्हणूनच आम्ही त्यांच्या पाया पडलो.

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #Kolhapur
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended