भाजप जोमात, राष्ट्रवादी कोमात! भोसले, नाईक अन् वाघ यांचा भाजपात प्रवेश | CM Devendra Fadnavis

  • 3 years ago
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवेंद्रराजे भोसले, संदीप नाईक अन् चित्रा वाघ यांचा भाजपात प्रवेश
मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बुधवारी (31 जुलै) भाजपमध्ये मेगाभरती झाली. राष्ट्रवादी-काँग्रेस आणि काँग्रेसमधून आमदार, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, संदीप नाईक, मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड, काँग्रेसचे कालीदास कोळंबकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील गरवारे क्लब येथे हा भाजपप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. 'भाजप'वासी होण्यासाठी या सर्व आमदारांनी मंगळवारी (30 जुलै) विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. शिवेंद्रसिंहराजे साता-यातील जावळीचे, पिचड अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, कोळंबकर मुंबईतील वडाळा तसेच नाईक हे नवी मुंबईतील बेलापूरचे आमदार होते. एवढ्या मोठ्या संख्येनं आज भाजपमध्ये मेगाभरती झाल्यानं ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडल्याचं दिसत आहे. गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपप्रवेश केला. यावेळेस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार आणि विनोद तावडे आदींसह भाजपाचे प्रमुख नेते हजर होते.

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #Mumbai
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended