सर्व प्रवाशी सुखरुप एकनाथ शिंदे घटनास्थळी | Mahalaxmi Express | Eknath shinde meet to passengers
  • 3 years ago
Mahalaxmi Express : सर्व प्रवाशी सुखरुप, पालकमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी
वांगणी परिसरात अतिवृष्टीमुळे अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांची योग्य प्रकारे सुटका करून सुरक्षित ठिकाणी नेण्याची व्यवस्था करण्यात आली. अनेक तास अडकून पडलेल्या प्रवाशांना शिवसेनेच्या वतीने तात्काळ पिण्याचे पाणी, नाश्ता तसेच जेवणाची व्यवस्था यासमयी लक्ष्मी मंगल कार्यालय येथे करण्यात आली.

याप्रसंगी प्रवासादरम्यान आजारी पडलेल्या उस्मान हुसेन धनावडे तसेच मुकुंद तांबे या प्रवाशांना एन.डी.आर.एफ. च्या मदतीने सुरक्षित ठिकाणी पोहोचवून रुग्णालयात संपूर्ण उपचारांची व्यवस्था करण्याबाबत रुग्णालय प्रशासनास निर्देश दिले. प्रसंगावधानता दाखवीत वांगणी येथील स्थानिक ग्रामस्थांनी अनेक तास पुरापरीस्थितीतून महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात केलेल्या मदतकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी यासमयी चोख कामगिरी बजावली, त्यांचेदेखील मनापासून कौतुक केले. बदलापूर शिवसेना शहरप्रमुख व माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, तुकाराम म्हात्रे यांच्या सोबत शिवसैनिकांनी मदतकार्यात बहुमोल सेवा देत प्रवाशांना इच्छित ठिकाणी नेण्याचीसुद्धा व्यवस्था केली.

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19
Recommended