Lokmat News | लग्‍नात नवरदेवाला भेट म्हणून दिले चक्‍क माकड | Wedding Gift | Lokmat Marathi News

  • 3 years ago
हरियाणातील टोहाना येथील निवासी असलेल्या संजय पुनिया याचं डवानाखेडा येथील रितूसोबत लग्‍न ठरलं. ठरल्याप्रमाणे दोघांचा लग्‍नसोहळा ११ फेब्रुवारी रोजी पार पडला. या लग्‍नात मुलीच्या नातेवाईकांनी संजयला भेट म्हणून माकड दिले. संजयही गेल्या काही दिवसांपासून माकड खरेदी करण्याचा विचार करत होता आणि त्यातच त्याला ही भेट मिळाल्याने तो अतिशय खूश झाला! संजयने सांगितले की, त्याच्याकडे म्हशी आहेत तसेच पावणे दोन एकर परिसरात चारा आहे. मात्र, नेहमी त्या ठिकाणी माकडं येतात आणि चारा घेऊन जातात. त्यासाठी तेथे एक कामगार ठेवला जो माकडांना चारा घेऊन जाण्यापासून रोखेल; मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. या संपूर्ण घटनेची माहिती मुलीच्या सासरच्या लोकांनाही होती. त्यामुळे त्यांनी संजयला माकड गिफ्ट देण्याचं ठरवलं. आता हे माकड आल्याने त्यांच्या शेतात येणारी इतर माकडं कमी झाली आहेत. त्यामुळेच संजय खुश आहे!

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended