दक्षिण आफ्रिकेतला दुष्काळ ह्यामुळे भारतीय फलंदाजांना फायदा | Latest Lokmat News
  • 3 years ago
सध्या दक्षिण आफ्रिकेतील बहुतांश महत्वाच्या शहरांना दुष्काळ आणि पाणी टंचाईने ग्रासलं आहे. या कारणामुळे आफ्रिके च्या संघाला फायदा होईल अशी खेळपट्टी बनवणं अवघड असल्याचं मैदानातील कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातली पहिली कसोटी ५ जानेवारी पासून केप टाऊनच्या न्यू लँड्स मैदानावर खेळवली जाणार आहे. स्थानिक प्रशासनाने सर्व नागरिकांना एका दिवसाला ८७ लिटरच्या वर पाणी वापरण्यास मनाई केली आहे. केप टाऊनच्या मैदानावर बोअरवेलच्या पाण्याची सोय आहे. मात्र केप टाऊनच्या मैदानाचे क्युरेटर इवन फ्लिंट यांनी दिलेल्या माहितीनूसार, पहिल्या कसोटीची खेळपट्टी ही आफ्रिकेच्या संघाला फायदेशीर ठरेल याची खात्री देता येणार नाही.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Recommended