मालवणच्या समुद्र किनारपट्टीवर ‘तारली’चा बंपर धमाका काय ते पाहा हा वीडियो | Lokmat News

  • 3 years ago
कोकण किनारपट्टीवर ओखी वादळाने मच्छी मारांच्या नाकी दम आणले होते. रविवारी मच्छीमारांनी पुन्हा नव्या उमेदीने मच्छीमारीस प्रारंभ केला. त्याचदरम्यान, सकाळी मालवण किनारपट्टीवर नारायण तोडणकर यांच्या रापणीला 200 खंडी तारली बंपर स्वरुपात आढळून आली. मोठय़ा प्रमाणात मासळी मिळाल्याने मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.ओख्खी वादळानंतर काहीसा मासेमारी हंगाम बंद असल्याने मच्छीमारांचे नुकसान झाले होते. मोठय़ा प्रमाणात तारली मासळी किना-यालगत लाटांसोबत येत असल्याने तिला पाहण्यासाठी आणि पकडण्यासाठी स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनीही गर्दी केली होती.स्थानिक मालवणी भोजनाचा आस्वाद घेतानाच रविवारी मालवणात प्रत्यक्षात मासळी पकडण्या ची संधी मिळाल्याने पर्यटकां साठी ही एक सुवर्णसंधीच ठरली. ओखीच्या परिणामाने समुद्राच्या हालचाली बदलल्या असल्याने त्यातूनच तारली सारखी मासळी किना-यावर येत असल्याचा अंदाज ज्येष्ठ मच्छिमार बांधवांनी व्यक्त केला.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended