नोटबंदीनंतर 2 लाख 24 हजार बोगस कंपन्या बंद | Indian Banknote Demonetisation

  • 3 years ago
नोटबंदीनंतर बोगस आणि गैरव्यवहार करणाऱ्या कंपन्याविरोधात केंद्र सरकारने मोहीम उघडलीये. आतापर्यंत 2 लाख 24 हजार बोगस कंपन्यांना टाळ ठोकण्यात आलंय. तसंच नोंदणीकृत कंपन्यांपैकी एक तृतीयांश कंपन्या बंद असल्याची आकडेवारी समोर आली आहे.या कंपन्यांच्या जवळपास तीन लाख संचालकांना अपात्र ठरवण्यात आलंय. पण यापेक्षा आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे.कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार, देशातल्या नोंदणीकृत एकूण सुमारे 17 लाख पैकी ऑक्टोबर अखेर जवळपास 11.30 लाख कंपन्या या कार्यरत आहेत, इतर जवळपास 5.70 लाख कंपन्या कार्यरत नसल्याचे समोर आले आहे. याचा अर्थ या कंपन्यांची नोंद झाली मात्र त्या कंपन्यामार्फत उद्योग व्यापार अथवा व्यवहार झालेच नाहीत.दरम्यान, नोटाबंदी नंतर बँकांमध्ये हजारो खाती उघडून हवाला मार्फत काळ्या पैशाचा व्यवहार करणारे अथवा काळा पैसा पांढरा करणाऱ्या कंपन्या समोर आल्या तसेच लाच किंवा टक्केवारी-कमिशन अशा गैरव्यवहाराचे पैसे अशा कंपन्यामार्फत घेतले जातात हेही स्पष्ट झालंय. त्यात ही नवी आकडेवारी समोर आल्याने चौकशीची कक्षा रुंदावली आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended