गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर या अभिनेत्रीचा जलवा । Janhvi Kapoor News

  • 3 years ago
गोव्यात सोमवारपासून सुरु झालेल्या 48व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर जान्हवी कपूर ग्लॅमरस लूकमध्ये नजरेस आली. गेल्या काही दिवसांपासून जान्हवी तिच्या डेब्यू चित्रपट ‘धडक’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या घोषणेनंतर जान्हवी प्रथमच रेड कार्पेटवर दिसली.

‘ईफ्फी’साठी श्रीदेवी आणि बोनी कपूर हे दोघे देखील जान्हवी सोबत होते. जान्हवीच्या डेब्यू चित्रपटात श्रीदेवीच आईच्या भूमिकेत असणार आहे. याआधी श्रीदेवीने ‘मॉम’ हा चित्रपट केला होता.

‘धडक’मध्ये जान्हवीसोबत शाहिद कपूरचा सावत्र भाऊ इशान खेतर हा मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान तर याची निर्मिती करण जोहर करणार आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended