भारताची मानुषी चिल्लर ठरली मिस वर्ल्ड 2017 | Manushi Chhillar Latest Update
  • 3 years ago
चीनमध्ये रंगलेल्या 'मिस वर्ल्ड 2017' या सौंदर्याच्या जगतातील सर्वोच्च स्पर्धेत 'मिस इंडिया' मानुषी छिल्लरने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे तब्बल 17 वर्षांनंतर भारतीय सौंदर्यवतीने हा मानाचा मुकूट पटकावला आहे.
विश्वसुंदरी स्पर्धेत 'मिस इंग्लंड' स्टेफनी हिल ही दुसऱ्या तर 'मिस मेक्सिको' अॅण्ड्रीया मेझा तिसऱ्या स्थानी राहिली. यंदाच्या मिस वर्ल्ड स्पर्धेत जगभरातील 118 सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. अप्रतिम सौंद्य आणि अफाट बुद्धिमत्ता याच्या जोरावर मानुषीने या सर्वांवर मात करत विश्वसुंदरीच्या मुकूटाला गवसणी घातली. मानुषी हरयाणातील सोनीपत शहरातील रहिवासी आहे.कोणत्या पेशासाठी सर्वाधिक पगार मिळाला पाहिजे आणि तो का मिळाला पाहिजे?, असा प्रश्न मानुषीला अंतिम फेरीत विचारण्यात आला होता. त्यावर 'आईला सर्वात जास्त सन्मान मिळायला हवा आणि हा सन्मान पैसा वा पगाराच्या रूपात नव्हे तर प्रेम आणि आदराच्या स्वरूपात असावा', असे मानुषी म्हणाली आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. मानुषीच्या आधी 2000 मध्ये सध्याची आघाडीची अभिनेत्री प्रियंका चोप्राने मिस वर्ल्ड किताब जिंकला होता. त्यानंतर 17 वर्षांनी 20 वर्षीय मानुषी छिल्लरने हा किताब पुन्हा भारताकडे खेचून आणला आहे. मानुषी 67वी मिस वर्ल्ड ठरली.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Recommended