पुन्हा एकदा अघटीत घडले. अमिताभ बच्चन अपघातातून बचावले | Amitabh Bachchan Latest News
  • 3 years ago
बॉलीवूडचे महानायक अमिताभज बच्चन कोलकातामधील एका कार अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. कारमधून ते विमानतळाच्या दिशेने जात होते. त्याचवेळी कारच्या मागचे चाक निखळले आणि अपघात झाला. अमिताभ गेल्या आठवड्यात 23 व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी गेले होते. तेथून शनिवारी सकाळी ते मुंबईला परतणार होते. एका कारमधून ते विमानतळाकडे जात होते. त्याच वेळी मागचे चाक निखळले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारला अपघात झाला. या अपघातातून ते बचावले आहेत. त्यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. पश्चिम बंगाल सरकारच्या सचिवालयातील अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा दिला आहे. अमिताभ यांच्यासाठी कार उपलब्ध करून देणाऱ्या ट्रव्हल एजन्सीला राज्य सरकारने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Recommended