तर मोबाईल बंद होणार नाही | Do You Link Your Aadhaar Card | लोकमत मराठी न्यूज़
  • 3 years ago
सध्या प्रत्येकाच्या मोबाईलवर नेटवर्क ऑपरेटर कंपन्यांकडून मेसेज येत आहे की आधार कार्ड नंबर
मोबाईल शी लिंक करा अन्यथा सेवा खंडित करण्यात येईल. ह्यावर दूरसंचार विभागाने स्पष्टीकरण दिले
आहे कि मोबाईल क्रमांक आधारला जोडण्याच्या निर्णयावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे
मोबाईल क्रमांक आधार शी न जोडल्यास बंद होणार नाही. आधार शी लिंक न केल्याच्या कारणास्तव
मोबाईल कंपन्यांना कोणाचेही मोबाईल क्रमांक बंद करता येणार नाहीत. अनेक ग्राहकांनी सर्वोच्च
न्यायालयात याचिका दाखल केल्या असून, हा निर्णय न्यायालयात आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या
निर्णयाची आम्ही वाट पाहत आहोत असे दूरसंचार विभागाच्या सचिव अरुणा सुंदराजन म्हणाल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी आता १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Recommended