आणि खिचडी शिजताच रीकॉर्ड झाला | India Sets Guinness World Record By Cooking 918 kg Khichdi
  • 3 years ago
भारताचे इंडिया गेट साऱ्या विश्वात प्रसिद्ध आहे. परंतु आज ते अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध झाले.इंडिया गेट येथे आयोजित वर्ल्ड फूड फेस्टिवल मध्ये शनिवारी ९१८ किलोग्राम खिचडी तयार करण्यात आली. ह्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स मध्ये करण्यात आली. शेफ संजय कपूर आणि त्यांच्या ५० सहकाऱ्यांनी मिळून तयार केलेल्या खिचडीला भारताचा खाद्य पदार्थ म्हणून सादर करण्यात आले. ह्यावेळी भारताच्या केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल, राज्यमंत्री निरंजन ज्योती आणि योग गुरु बाबा रामदेव ह्यांनी खिचडीला फोडणी दिली. खर तर फक्त ५०० किलोग्राम खिचडीच वर्ल्ड रीकॉर्ड करण्यासाठी पुरेशी होती. हि खिचडी तयार झाल्यानंतर ६० हजार लोकांनी तिचा आस्वाद घेतला. ह्यात अनेक अनाथ मुलांचा सुद्धा सहभाग होता.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Recommended