कॉंग्रेसला हार्दिक धमकी | Hardik Patel Latest News | Lokmat Marathi News
  • 3 years ago
कॉंग्रेसला हार्दिक धमकी.

सध्या गुजरात मध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. मोठे जनसमर्थन असलेल्या नेत्यांना
आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रत्येक पक्ष प्रयत्न करीत आहेत. पाटीदार समाजाला आरक्षण
मिळावे म्हणून हार्दिक पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुजरात चे वातावरण ढवळून काढले.
त्यातले काही सहकारी भा.ज.पा. च्या गळाला लागले आहेत, तर काही कॉंगेस च्या पारड्यात
जाण्याची शक्यता आहे, परंतु पाटीदार देता हार्दिक पटेल कुठल्या पक्षाला झुकतं माप देईल ही
उत्सुकता ताणून राहीलेली आहे. त्यांनी राहुल गांधींची गुप्त भेट घेतली आहे अशी ही चर्चा आहे.
परंतु त्यांनी आता कॉंग्रेसलाच ट्विटर च्या आधारे धमकी दिली आहे कि ३ नोव्हेंबर पर्यंत तुमचा
आरक्षणाबाबत तुमचा निर्णय कळवावा नाहीत तुमची सुद्धा अमित शहांसारखी अवस्था करण्यात
येईल आणि ह्यामुळे कॉंग्रेस मध्ये नक्कीच खळबळ माजली असेल.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Recommended