लाईव्ह कार्यक्रमात सुरु झाल्या प्रसूतीकळा | The Live Program Begins with the Delivery Time

  • 3 years ago
लाईव्ह कार्यक्रमात सुरु झाल्या प्रसूतीकळा

प्रसूतीची वेळ जवळ आली असतानाही आपले नियमित काम करणार्‍या अनेक धीर महिला आहेत. वृत्तवाहिनीवर लाईव्ह कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना अशाच एका महिला अँकरला भलत्याच परिस्थितीचा सामना करावा लागला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरू असतानाच तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. पण, तिने त्याही स्थितीत सूत्रसंचालन कायम ठेवले आणि आपला कार्यक्रम पूर्ण केला.

नेटली पास्कक्व्रेला असे या महिला अँकरचे नाव आहे. नेटलीच्या प्रसूतीला काही दिवसांचा अवधी होता. त्यामुळे अद्यापही ती सूत्रसंचालक म्हणून काम करत होती. मात्र, एका कार्यक्रमादरम्यान सूत्रसंचालन सुरू असताना अचानकच तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. या वेळी ती ट्विटरवरील वाढती शब्दमर्यादा या विषयावर चर्चा करत होती. ही चर्चा थेट प्रक्षेपीत होत होती. अचानक तिला जाणवले पोटात काहीतरी गडबड होत आहे. वेदनाही येत आहेत. पण, तिने त्या वेदना हसतमुख चेहर्‍याने सहन केल्या. शो पूर्ण केला. दरम्यान, तिने आपल्या कळांबाबत सहकार्‍यांना सांगितले. त्यानंतर तिच्या सहकार्‍यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. तब्बल 13 तासांच्या उपचारानंतर तिने गोंडस बाळाला जन्म दिला. या वेळी तिचा पती जामिन हा सुद्धा रुग्णालयात उपस्थित होता.

Recommended