शिया मुस्लिम देणार बाण | Shia Will Give Muslim Arrow

  • 3 years ago
शिया मुस्लिम देणार बाण

उत्तर प्रदेश सरकारकडून शरयूच्या तटावर श्रीरामाचा पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्यासाठी शिया वक्फ बोर्डाने १० चांदीचे बाण भेट म्हणून देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी शिया वक्फ बोर्डाकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. बोर्डाचे सचिव वसीम रिझवी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. काही शिया मुस्लिमांना श्रीरामाच्या १०० फुटी पुतळ्यासाठी १० चांदीचे बाण भेट द्यायची इच्छा असल्याचे वसीम रिझवी यांनी उत्तर प्रदेश सरकारला दिलेल्या प्रस्तावात नमूद केले आहे. शियांकडून देण्यात येणारे बाण भारताच्या दहशतवादविरोधी लढाईचे प्रतीक असतील, असे रिझवींनी म्हटले आहे. ‘ज्याप्रकारे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाने बाणांचा वापर करुन राक्षसांचा वध केला होता, त्याचप्रकारे हे बाण दहशतवादविरोधी लढाईचे प्रतिक होतील. त्यामुळे सर्व धर्मांचे लोक भारतात शांततेत राहू शकतील,’ असे शियांकडून देण्यात आलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.

Recommended