Unemployemnt :चिंताजनक! देशाच्या बेरोजगारीत वाढ, पाहा ही धक्कादायक आकडेवारी | Sakal Media |
  • 3 years ago
देशाचा जीडीपी, जीएसटी संकलन तसेच शेअर बाजारातही मोठी वाढ झाल्यानं अर्थकारणाचं चक्र पुन्हा गतिमान झाल्याचे सकारात्मक चित्र निर्माण झालं होतं. मात्र ऑगस्टमध्ये देशाचा बेरोजगारी दर 8.32 टक्क्यांपर्यंत वाढल्याची चिंताजनक आकडेवारी सीएमआयई म्हणजेच सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने प्रसिद्ध केलीय. या आकडेवारीनूसार, ऑगस्टमध्ये तब्बल साडे पंधरा लाख भारतीयांनी आपल्या नोकऱ्या गमावल्यात. त्यामुळे जीडीपी वाढत असला, तरी ऐन कोरोनाकाळात मध्यमवर्गीयांच्या खरेदीक्षमतेवर मोठा परिणाम झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतंय. सीएमआयईच्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये देशाचा बेरोजगारीचा दर 6.95 टक्के होता; मात्र ऑगस्टमध्ये त्यात 1.37 टक्क्यांनी वाढ होऊन हा दर आता 8.32 टक्क्यांपर्यंत गेलाय. त्यातही शहरी बेराजगारीचे प्रमाण जुलैमध्ये 8.3 टक्के होते; ऑगस्टमध्ये हा दर तब्बल 9.78 टक्क्यांवर गेलाय.
#unemployment #lockdown #jobs #youth #indianyouth #gdp #economy #india #marathinews #sakal #sakalnews
Recommended