Kolhapur : पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य : केंद्रीय समिती
  • 3 years ago
Kolhapur : पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य : केंद्रीय समिती

Kolhapur : राज्यांच्या तुलनेने कोल्हापूर मधील रुग्ण संख्येचा आलेख वाढत आहे. पण, कोल्हापूर जिल्ह्यात इतर जिल्ह्याच्या तुलनेत दुसरी लाट वेळाने आली आहे. हे गंभीर आहे असं काहीच नाही. कोल्हापुरातील नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे. कोल्हापुरात सध्या ६० वयोवर्षावरील ७८ लोकांचे लसीकरण झाले आहे. कोल्हापुरातील रुग्ण पॉझिटिव्हीटी रेट टप्प्याटप्प्याने कमी होत आहे. सध्या तो १० पेक्षाही कमी असून जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण नाहीत. तर, तिसऱ्या लाटेचीही तयारी केले असल्याची माहित केंद्रीय समितीचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे, या पार्श्वभूमीवर केंद्रीय समितीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोना वाढीचा आढावा घेतला त्यानंतर आवटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

बातमीदार - सुनील पाटील

व्हिडीओ - बी. डी. चेचर

#vaccination #kolhapur
Recommended