Satara : बंडातात्या कऱ्हाडकरांची स्थानबद्धतेतून सुटका करावी : विलासबाबा जवळ

  • 3 years ago
Satara : बंडातात्या कऱ्हाडकरांची स्थानबद्धतेतून सुटका करावी : विलासबाबा जवळ

Satara (कऱ्हाड) : बंडातात्या कऱ्हाडकर यांची स्थानबद्धतेतून तातडीने सुटका करावी, या मागणीचे निवेदन देण्यास मोजकेच वारकरी एकत्र येवून जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना निवेदन देणार होते. वारकरी संप्रदायातील मंडळी एकत्र येणार होती. त्या परवानगीला पोलिसांना निवेदनही दिले होते. आज पहाटे सकाळी ५-४५ वाजता जवळवाडी येथील घरून विलासबाबा जवळ यांना मेढा पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले आहे. अनेक ठिकाणी सातारा जिल्ह्यातील वारकरी आणि युवक यांची धरपकड सुरू झाली आहे.

#bandatatyakaradkar #vilasbabajawal #satara

Recommended