खासदार धोत्रे बनले विद्यार्थी

  • 3 years ago
शिक्षण घेण्यास वयाचे बंधन नसते, असे म्हणतात. अकोला लोकसभा मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक साधणारे भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार संजय धोत्रे यांनी हे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. खासदार महोदय सध्या एलएलबीची परीक्षा देत आहेत. अकोला, वाशीम व जिल्ह्यातील रिसोड अशा भल्या मोठ्या मतदारसंघात विस्तारलेल्या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे खासदार संजय धोत्रे गत आठ दिवसांपासून आपल्या व्यस्त कार्यक्रमांमधून वेळ काढत एलएलबीचा अभ्यास करीत आहेत. शालेय जीवनात सकाळी पाच वाजता उठून अभ्यास करण्याची त्यांची जुनीच सवय. इंजिनिअरिंग करतानाही अभ्यासाचा हाच कित्ता गिरवीत ते गुणवत्ता यादीत झळकले. त्यानंतर समाजकारण आणि राजकारणात सक्रिय झाल्याने पुढचे शिक्षण घेता आले नाही. मात्र, शिकण्याची त्यांनी जिद्द सोडली नाही. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, त्यांच्या समस्या कायद्याच्या कचाट्यात अडकत असल्याने कायद्याचे ज्ञान संपादन करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा त्यांचा ध्यास आहे. आज त्यांनी एलएलबीच्या चौथ्या प्रोफेशनल एथिक्‍स सेमीस्टरची परीक्षा दिली आहे.

Recommended